राज्यातील पावसाला या दिवशी लागणार स्टॉप, तर या दिवशी मान्सूनचे आगमन हवामान विभागाचा अंदाज arrival of monsoon

शेतकरी व्हाट्सअप ग्रुप Join Now

arrival of monsoon शेतकऱ्यांची चिंता वाढली, पण ओलावा आणि पाणीटंचाईची समस्या मिटणार मौसम खात्याच्या अंदाजानुसार, खरिप हंगामापूर्वीच विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे. तथापि, जमिनीत ओलावा निर्माण होण्याची शक्यता असल्याने पाणीटंचाईची समस्या कमी होण्यास मदत होईल.

पावसाने विदर्भाला झोडपलं 1 मार्च ते 11 मे या कालावधीत विदर्भात 251 टक्के जास्त पाऊस झाला आहे. कृषी विद्यापीठांच्या मते, खरिप पेरणी अगोदरच विदर्भात मुसळधार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. पिकांची लागवड करणे अवघड होईल, तर नुकतेच उगवलेल्या पिकांना धोका निर्माण होईल.

मराठवाड्यातही वाढला पावसाचा जोर मराठवाड्यातही 32 टक्के जास्त पाऊस पडला आहे. याचाही पेरणीवर परिणाम होऊ शकतो. ज्वारी, बाजरी आणि कापसाची पेरणी करणे अडचणीचे होईल. उन्हाळी पिकांचीही नासाडी होण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा:
Maharashtra Rain पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस; या भागात ऑरेंज तर कुठं यलो अलर्ट जारी Maharashtra Rain

उन्हाळ्यात मुंबईकरांना पावसाचा दिलासा मुंबईकरांना उन्हाळ्यातून आराम मिळण्याची शक्यता आहे, कारण आगामी दोन दिवसांत सहा महानगरात पावसाची शक्यता आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार, 12 आणि 13 मे रोजी मुंबईत पाऊस पडू शकतो.

पावसाचा जोर कायम राहणार दक्षिण कोकण, गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये 13 आणि 14 मे रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे आणि महाबळेश्वरमध्येही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. arrival of monsoon 

पुढील आठवड्यात पावसाचा जोर कमी होईल 14 मे नंतर महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये 18 मे पर्यंत पाऊस पडू शकतो. महाराष्ट्रातल्या या अवकाळी पावसामुळे जमिनीत ओलावा वाढण्यास मदत होईल आणि पाणीटंचाईची समस्या कमी होण्यास हातभार लागेल.

हे पण वाचा:
today's weather या तारखेला महाराष्ट्राला धडकणार सर्वात मोठे चक्रीवादळ पहा आजचे हवामान today’s weather

Leave a Comment