लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या हफ्त्याची यादी जाहीर पहा तुमचे नाव Ladki Bahin Yojana

शेतकरी व्हाट्सअप ग्रुप Join Now

Ladki Bahin Yojana महाराष्ट्र राज्यातील सर्व महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकारने ‘माझी लाडकी बहीण’ योजना राबविली आहे. या योजनेतर्गत कोट्यावधी महिलांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरित करण्यात आला आहे.

माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीची तपशीलवार माहिती देताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, या योजनेंतर्गत आतापर्यंत एकूण ९६ लाख ३५ हजार महिलांच्या बँक खात्यात थेट ३ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. तसेच उर्वरित महिलांनाही लवकरच लाभ मिळावा या दृष्टीने महिला व बालकल्याण विभाग युद्धपातळीवर कार्यरत आहे.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आज सकाळपासून १६ लाख ३५ हजार भगिनींच्या खात्यात ३ हजार रुपये लाभ जमा झाले आहेत. त्यापूर्वी ८० लाख महिलांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण पूर्ण झाले होते.”

हे पण वाचा:
18th week 18 वा हफ्ता मिळवण्यासाठी आताच करा हे 5 काम अन्यथा मिळणार नाही 4000 रुपये 18th week

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना लागणारे पात्रता निकष काय आहेत?

  • २१ ते ६५ वर्ष वयोगटातील महिला पात्र
  • लाभार्थी महिला महाराष्ट्राच्या रहिवासी असणे आवश्यक
  • लाभार्थी महिलेच्या बँक खाते असणे आवश्यक
  • महिलेचे आधारकार्ड व बँक खाते यांची लिंकेज आवश्यक

या योजनेचा लाभ मिळण्यासाठी महिलांनी जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात अर्ज केला असेल तर ३० ऑगस्टपर्यंत त्यांच्या बँक खात्यात ३ हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांना मिळणारी एक मोठी आर्थिक मदत असून या योजनेतून गरजू महिलांना मदत मिळण्यास मदत होणार आहे.

हे पण वाचा:
price of gold अचानक सोन्याच्या दरात मोठी घसरण; पहा आजचे 10 ग्रामचे नवीन दर price of gold

Leave a Comment