solar pump online status पंतप्रधान किसान उर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान (पीएम कुसुम) योजनेबद्दल बोलणार आहोत. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सौर ऊर्जेच्या साहाय्याने शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्याची सोय करण्यात आली आहे.
राज्यात बरेच शेतकरी या योजनेसाठी अर्ज करून आपली नोंदणी करून घेतली आहे. काहींची अर्ज मंजूर झाली असून त्यांना सौर ऊर्जा पंप मिळाली आहेत. पण अजूनही बरेच शेतकरी वेटिंग लिस्टमध्ये आहेत. आपल्या अर्जाची स्थिती काय आहे हे आपण ऑनलाइन पद्धतीने तपासू शकतो.
पीएम कुसुम योजनेंतर्गत अर्ज केल्यानंतर प्रत्येकाला एक अर्ज क्रमांक (MK ID) दिला जातो. या आयडीच्या आधारे आपण आपल्या अर्जाची ऑनलाइन स्थिती तपासू शकतो. यासाठी महावितरणच्या वेबसाइटवर जावे लागेल. वेबसाइटवरच्या एका विशिष्ट लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील.
मित्रांनो पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारला जाईल की तुम्ही पैसे भरून प्रलंबित आहात की नाही त्यानंतर प्रक्रिया तुम्हाला करावी लागेल. आपण पीएम कुसुम योजनेसाठी अर्ज केला असल्याने आपण ‘होय’ निवडावा.
त्यानंतर तुम्हाला दुसरा प्रश्न असा विचारला जाणार आहे असं महाराष्ट्र ऊर्जा विकास अभियान पीएम किसान योजनेसाठी आधीच नोंदणी केली गेली आहे का येथे सुद्धा आपल्याला होय अशी प्रतिक्रिया द्यायची आहे.
आता येथे नेमके काय करायचे हे समजावून घ्यायचे आहे. तुम्हाला येथे तुमचा अर्ज क्रमांक (MK ID) टाकायचा आहे आणि नंतर “शोधा” या बटणावर क्लिक करायचे आहे. अर्ज क्रमांक नेमका कोणता हा तुम्ही शेतकरी आहात त्या प्रमाणेच असेल.
“शोधा” बटणावर क्लिक केल्यानंतर तुमचा पूर्ण अर्ज तपशील उघडेल. या तपशिलात तुमच्या अर्जाची सद्य:स्थिती उजवीकडच्या शेवटच्या कॉलममध्ये दाखवली जाईल. जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर तेथे “मंजूर” असे लिहिलेले दिसेल. पण जर तुमचा अर्ज अजून मंजूर झालेला नसेल तर तेथे “प्रतीक्षा यादी” असे लिहिलेले दिसेल.
या सोप्या पद्धतीने आपण घरीबसून आपल्या अर्जाची ऑनलाइन स्थिती तपासू शकतो. अर्ज मंजूर झाल्यानंतर योग्य कागदपत्रांसह पुढील प्रक्रिया करावी लागेल. त्यानंतरच सौर ऊर्जा पंपाची स्थापना केली जाईल आणि शेतीला निरंतर पाणीपुरवठा होऊ शकेल. solar pump application