Orange Alert उष्णतेच्या लाटांपासून दिलासा मिळण्यासाठी वाट पाहणाऱ्या राज्यवासीयांना आज मोठा दिलासा मिळाला आहे. कोकण विभागावगळता मुंबईसह अनेक भागात उन्हाचा जोर वाढला होता. परंतु विदर्भ, मराठवाडा यासह मध्य महाराष्ट्रातही अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तापमानात घट झाली आहे. अनेक भागात मेघगर्जनेसह पावसाने पहाटेपासूनच हजेरी लावली आहे.
पुढील 24 तासांत अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांत पुणे, नाशिक, सोलापूर, सांगली, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. या भागात सोसाट्याचा वारा पाहायला मिळणार असून वाऱ्याचा वेग 40 ते 50 किमी प्रति तास असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पावसाचा यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी
हवामान विभागाने आज नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, सोलापूर, औरंगाबाद या भागात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तर सातारा, कोल्हापूर, जळगाव नंदुरबार, धुळे या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे अमरावती जिल्ह्याला आज पाऊस आणि गारपीट होण्याचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भात पावसासह गारपीट होण्याची शक्यता
विदर्भातही पावसासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली यासह अन्य जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. याशिवाय अहमदनगर, जालना, परभणी, बीड या भागातही तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागात काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. rain
शुक्रवारी वातावरण सामान्य राहण्याची शक्यता
मात्र 10 मे रोजी गुरुवारी येणाऱ्या अवकाळी पावसानंतर शुक्रवारी (10 मे) वातावरण सामान्य राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत पावसाची शक्यता तसेच नाही. उष्णतेच्या लाटांपासून दिलासा मिळण्यासाठी आलेल्या या अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांनाही बसू शकतो.
निसर्गाचा असा लहरीपणा पाहून शेतकरी आणि नागरिकांना काळजी वाटत असली तरी हवामानातील बदल अटळ आहेत. अशा परिस्थितीत जनजीवनावर परिणाम होऊ नये म्हणून सर्वांनीच दक्षता बाळगणे आवश्यक आहे.