Namo Shetkari Yojana 2024 : नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये या दिवशी खात्यात जमा होणार ..!

शेतकरी व्हाट्सअप ग्रुप Join Now

Namo Shetkari Yojana 2024 महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारच्या शेतकरी आर्थिक सहाय्य योजनांमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेबरोबरच आता राज्य सरकारची ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनाही सुरू होणार आहे. या दोन्ही योजनांमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 12 हजार रुपये वार्षिक जमा होणार आहेत.

केंद्र सरकारची ‘प्रधानमंत्री किसान सम्मान निधी’ योजना 2019 पासून सुरू आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये मिळतात. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये जमा केली जाते. सध्या या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर 13 हप्ते म्हणजेच 26 हजार रुपये जमा झाले आहेत.

आता राज्य सरकारने केंद्रीय योजनेच्या धर्तीवरच ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 4 हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेचा पहिला हप्ता यामहिन्यातच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.

हे पण वाचा:
Shelipalan Aani Kukutpalan Aanudan शेळीपालन आणि कुकूटपालनासाठी शेतकऱ्यांना सरकार देत आहे 4 लाख अनुदान पहा अर्ज प्रक्रिया..! Shelipalan Aani Kukutpalan Aanudan

केंद्र आणि राज्य सरकारच्या या दोन्ही योजनांमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षभरात 12 हजार रुपये जमा होणार आहेत. केवळ शेतजमिनीवरच अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा मोठा आर्थिक दिलासा ठरणार आहे.

केंद्र सरकारची योजना लागू करण्यासाठी शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली होती. आता राज्य सरकारची योजना लागू करण्यासाठीही केंद्राच्या यादीचाच आधार घेतला जाणार आहे. राज्य कृषी विभागाने या पात्र शेतकऱ्यांची अंतिम यादी तयार करण्यासाठी केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार केला आहे.

सध्या राज्याची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. कोरोनामुळे राज्याच्या महसुलावर परिणाम झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारला या योजनेसाठी निधी उभारणे अवघड होणार आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमधून या योजनेसाठी निधीची तरतूद करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तोपर्यंत आपत्कालीन निधीतून या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे.

हे पण वाचा:
Ration card रेशन कार्ड धारकांचे आजपासून गहू तांदूळ बंद मिळणार 9 वस्तू मोफत Ration card

शेतकऱ्यांवर अनेक संकटे कोसळली आहेत. दुष्काळ, महागाई, निसर्गाची रिक्षा अशा विविध संकटांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते. अशावेळी केंद्र व राज्य सरकारच्या या योजना शेतकऱ्यांसाठी आर्थिक दिलासा देणार आहेत. Namo Shetkari Yojana 2024

Leave a Comment