Manikrao Khule’s Monsoon 2024 पूर्व खरीप हंगामातच शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान झाले होते. गेल्या एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे पिके उद्ध्वस्त झाली होती.
यामुळे शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक फटका बसला होता. अशातच गेल्या काही दिवसांपासून पुन्हा वादळी पावसाची सुरुवात झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवारपर्यंत राज्यात वादळी पावसाचे सत्र सुरू राहण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांच्या मनात भीती या वादळी पावसामुळे शेतकरी बांधवांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांना आता या वादळी पावसाचा पुढील मान्सूनवर परिणाम होणार नाही ना अशी भीती वाटत आहे. अशा स्थितीत ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी मान्सूनसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.
एल निनो कमकुवत होईल खुळे यांच्या माहितीनुसार एल निनो हा या महिन्याच्या अखेरपर्यंत कमकुवत होण्याची शक्यता आहे. तसेच पुढील महिन्यात जून किंवा जुलैमध्ये अल निनो तटस्थ अवस्थेत म्हणजे न्यूट्रल होणार आहे.
ला निना सक्रिय होण्याची शक्यता खूळे यांनी ला निना हा ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली आहे. जेव्हा एलनिनो सक्रिय असतो तेव्हा मान्सून काळात कमी पाऊस पडतो. पण एलनिनो न्यूट्रल असल्यास त्याचा मान्सूनवर कोणताच परिणाम होत नाही. दुसरीकडे जेव्हा ला निना सक्रिय असते तेव्हा मान्सून काळात खूप चांगला पाऊस होतो.
आयओडीचा पॉझिटिव्ह असण्याची शक्यता यावर्षी इंडियन ओशन डायपोल (आयओडी) देखील पॉझिटिव्ह राहण्याची शक्यता आहे. यामुळे यंदा मान्सून काळात सरासरीपेक्षा जास्तीच्या पावसाची अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.
अतिवृष्टीची शक्यता या सर्व घटकांमुळे यंदा महाराष्ट्रात अतिवृष्टी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळेच खरीप हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते असे खुळे यांनी म्हटले आहे. Manikrao Khule’s Monsoon 2024
मान्सूनचे आगमन प्रत्येक वर्षी एक जूनला केरळमध्ये मान्सूनचे आगमन होत असते. मानसून १० जूनला मुंबईत दाखल होतो. त्यानंतर महाराष्ट्राच्या उर्वरित भागात मान्सूनची पोहोच होते. कधी मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल याबाबत जेव्हा मान्सून केरळमध्ये येईल तेव्हाच योग्य माहिती मिळेल.
वेळेआधीच येण्याची शक्यता
अनेक हवामान तज्ज्ञांनी यावर्षी मान्सूनचे वेळेआधीच आगमन होऊ शकते असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे मान्सूनचे महाराष्ट्रात नेमके कधी आगमन होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.