heavy rains हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी 31 मे रोजी नवीन हवामानाचा अंदाज वर्तवला. मान्सूनने केरळच्या बराचश्या भागात प्रगती केली असल्याचे त्यांनी सांगितले. डख यांनी वर्तवीलेल्या नवीन अंदाजानुसार राज्यात 2 जूनपासून पाऊस सुरू होत आहे.
सध्याच्या वाऱ्यांचा कालावधी संपणार
पंजाबराव डख म्हणतात की सध्या जोरदार वाहत असलेले वारे 1 जूनपासून बंद होतील. त्यानंतर 3 जून ते 10 जून या संपूर्ण आठवड्यात, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा तसेच विदर्भातील बुलढाणा पश्चिमेकडील जिल्ह्यात दररोज भाग बदलत पाऊस पडेल.
पावसाची शक्यता असणारे जिल्हे
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 जून ते 10 जून दरम्यान सांगली, सातारा, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, परभणी, जालना, बुलढाणा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, नाशिक या जिल्ह्यात दररोज भाग बदलत पाऊस पडेल.
हे पण वाचा:
पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस; या भागात ऑरेंज तर कुठं यलो अलर्ट जारी Maharashtra Rainओढे-नाले भरून जाण्याची शक्यता
पंजाबराव डख यांनी 3 जून ते 10 जून या कालावधीत काही ठिकाणी ओढे-नाले तुडुंब भरून जातील असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगणे आवश्यक आहे.
पेरणीसाठी योग्य वेळ
पंजाबराव डख यांनी सांगितले की चांगली ओल झाल्यानंतर पेरणी करावी. त्यांनी दिलेल्या नवीन अंदाजानुसार, यंदा विदर्भात पेरणी योग्य पाऊस 10 जून नंतर पडेल. परंतु पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीतील ओलावा तपासावा.
पंजाबराव डख यांच्या नवीन हवामान अंदाजानुसार, राज्यात आगामी काही दिवसांत मान्सूनची सुरुवात होणार आहे. शेतकरी बांधवांनी पेरणीची तयारी करावी आणि नागरिकांनी दक्षता बाळगावी. अशा प्रकारच्या अंदाजांमुळे आपण पुढील काळासाठी सज्ज राहू शकतो.