Heavy rain वातावरणात सध्या होत असलेल्या अवकाळी बदलामुळे महाराष्ट्रात पाऊस, गारपीट व वाऱ्यांचा जोर वाढला आहे. प्रदीर्घ काळापासून राज्यात पाऊस कमी होत असून, पावसाळ्याच्या काळातही ऊन अधिक होत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे.
आज रविवारीही राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील 72 तासात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विशेषत: विदर्भ व मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना आयएमडीने यलो अलर्ट जारी केला आहे.
पुढील तीन ते चार दिवस राज्यात पावसाची शक्यता कायम असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. तर, पुढील 48 तासात सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. काही भागांमध्ये गाटपीट आणि मुसळधार पावसाचाही अंदाज आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे, राज्यासह देशात अवकाळी पावसासाठी अनुकूल वातावरण पाहायला मिळत आहे.
रविवारी मध्य प्रदेशात आणि रविवारी पश्चिम उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा-चंडीगड-दिल्ली आणि राजस्थानमध्ये गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. आयएमडीने सोमवारपर्यंत उत्तर भारत आणि मध्य भारतात मोठ्या प्रमाणावर पाऊस, हिमवृष्टी आणि गडगडाटी वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये गडगडाटी वादळासह हलका ते मध्यम पाऊस, हिमवृष्टी, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारे वाहण्याचा अंदाज आहे.
राज्यात अवकाळी पावसाचा जोर वाढला असून, काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. खासकरून शेतीवर व फळबागांवर त्याचा मोठा परिणाम होत आहे. इतर बाबतीत देखील अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांसह इतरही नागरिक मोठ्या समस्यांना सामोरे जात आहेत.
सध्या राज्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून, यात मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होत आहे. यामुळे सरकार तातडीने उपाययोजना करण्यास प्रवृत्त होणे आवश्यक आहे. विशेषत: शेतकऱ्यांना मदत पोहोचवून त्यांची होत असलेली झीज कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत.
वातावरणात होत असलेल्या अवकाळी बदलांचा अभ्यास करून, अशी परिस्थिती पुढे येऊ नये म्हणून यावर उपाय योजणे गरजेचे आहे. चांगली पावसाळा यावी यासाठी शासनाने आवश्यक ते प्रयत्न करणे आवश्यक आहे.