राज्यातील या जिल्ह्याना मुसळधार पाऊस imd चा मोठा अंदाज बघा आजचे हवामान Heavy rain

शेतकरी व्हाट्सअप ग्रुप Join Now

Heavy rain महाराष्ट्रात निसर्गाने आपली विचित्र खेळी सुरू केली आहे. एकीकडे तापमानाचा पारा वाढत असताना, दुसरीकडे अवकाळी पावसाने धडकेच बसविले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांची दुरावस्था झाली आहे. त्यांच्या शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. आगामी खरीप हंगामासाठी आवश्यक असलेली पूर्वतयारी करण्यातही अडथळे येत आहेत.

विदर्भात पावसाचा कहर

विदर्भात गेल्या आठवड्याभरापासून अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे. अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठीही विदर्भातील सर्व जिल्ह्यांना अवकाळी पाऊस, विजांच्या कडकडासह 30-40 किमी प्रति तास सोसाट्याच्या वादळी वाऱ्याचा इशारा दिला आहे.

हे पण वाचा:
pm kisan yojna शेतकऱ्यांच्या खात्यावरती 6000 ऐवजी होणार 10 हजार रुपये जमा pm kisan yojna

कोकणात पावसाची शक्यता

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी, तर उत्तर कोंकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात वादळी वाऱ्यांची शक्यता

हे पण वाचा:
paid crop insurance पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी १४७०० रुपये पहा यादीत नाव paid crop insurance

मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा पाहायला मिळणार असून हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.

उष्णतेची लाट

अशा परिस्थितीत, जरी काही भागात अवकाळी पाऊस पडत असला तरी महाराष्ट्राच्या इतर भागात उष्णतेच्या झळा बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने काही ठिकाणी तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअस वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

हे पण वाचा:
10th pass job १०वी पास विध्यार्थ्यांसाठी ST महामंडळामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी असा करा अर्ज..! 10th pass job

निसर्गाचा हा विलक्षण खेळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसह सर्वांनाच विचार करायला भाग पाडत आहे. अशा वातावरणातून आपण कसे बाहेर पडू शकतो, याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. नैसर्गिक संकटांशी दोन हात करण्याची तयारी आपल्याला करावी लागणार आहे.

Leave a Comment