Crop insurance distribution महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देणारी उपाययोजना हाती घेतली आहे. गेल्या हंगामात झालेल्या अतिवृष्टी व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना पिकविमा योजनेअंतर्गत मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
पिकविमा योजनेची कार्यवाही सुरू
राज्यातील २४ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना खरीप पिकविमा योजनेंतर्गत अग्रीम पिकविमा वाटप करण्यात आलेले आहे. २४ जिल्ह्यांतील सुमारे ५२ लाख शेतकऱ्यांना २,२१६ कोटी रुपये इतका अग्रीम पिकविमा मंजूर करण्यात आलेला आहे. अग्रीम पीकविम्याची २५% रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली असून, आता उर्वरित ७५ टक्के पिकविमा वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
नुकसानीचा अंदाज
स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून नुकसानीला अनुसरून संबंधित विमा कंपन्यांना २५ टक्के अग्रिम पिकविमा रक्कम देण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर अधिसूचना काढण्यात आल्या आहेत.
हे पण वाचा:
ई-श्रम कार्ड धारकांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात आत्ताच पहा यादी e-shram card holdersयादरम्यान, राज्य शासनाच्या वतीने हवामान तज्ज्ञ, कृषी विद्यापीठांमधील तज्ज्ञ व्यक्तींचे सहकार्य घेऊन २१ दिवसांच्या पावसाच्या खंडाच्या नियमानुसार तसेच विविध तांत्रिक व विचारदृष्टीने शेतकऱ्याचे झालेले नुकसान विमा कंपन्यांसमोर सिद्ध करून कंपन्यांना विमा देण्यास भाग पाडले आहे.
ज्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विमा रकमेचा अंदाज १,००० रुपयांपेक्षा कमी असेल, अशा लघु शेतकऱ्यांना पूर्ण पिकविमा मिळेल. या शेतकऱ्यांना पिकविमा मिळण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे.
निसर्गाच्या संकटांमधून शेतकरी वर्गाला बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र शासन पुढाकार घेत आहे. अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना पिकविमा योजनेद्वारे आर्थिक मदत करून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे. यासाठी विविध स्तरांवर कार्यवाही सुरू असून, शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अंदाज घेऊन त्यांना योग्य प्रमाणात मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.