Cotton Varieties Prices नमस्कार शेतकरी मित्रांनो आता खरीप पेरणीची टाईम झालेली आहे आणि हवामान अंदाज यांच्या अंदाजानुसार राज्यात एक जून पासून मान्सून सक्रिय होणार आहे. तरी शेतकरी मान्सूनपूर्वीच बियाणाची खरेदी करत आहेत तसेच कापूस पिकांची कोणती लागवड करावी हा शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे.
पण गेल्या तीन ते चार वर्षांपासून कापूस बियाणामध्ये सर्वश्रेष्ठ बियाणे असणारे वाहन म्हणजे कबड्डी हे वान शेतकऱ्यांना भरगोस पिक देत आहे त्यामुळे शेतकरी याची दरवर्षी लागवड करत आहेत. तर आज आपण जाणून घेणार आहोत यावर्षी कबड्डी या वाहनाची काय किंमत असेल.
मित्रांनो गेल्या वर्षी कबड्डी या वानाला 1260 रुपये एवढी किंमत होती तरी यावर्षी बियाणाच्या किमतीमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे म्हणजेच या वर्षी कबड्डी या वानाची किंमत कमीत कमी 1300 रुपये एवढी असणार आहे असे कृषी केंद्र यांचा अंदाज आहे.
दरवर्षी शेतकरी या कबड्डी वानाच्या बियाणातून प्रती एकर दहा ते बारा क्विंटल उत्पादन घेत आहेत तरी यावर्षी त्यामध्ये वाढ होणार आहे असे कबड्डी कंपनीचे मालकाने सांगितले आहे कारण यामध्ये नवीन काहीतरी वाढ केली आहे.
गेल्या दोन वर्षापासून शेतकऱ्यांचे असे मत आहे की कबड्डी सारखे वाण हे आतापर्यंत झालेच नाही. या वाणाची लागवड खास करून जिरायती व कोरडवाहू तसेच बागायती ही लागवड करू शकतात कारण हे पिक कोणत्याही शेतामध्ये उत्पादन देते.
शेतकऱ्यांनी असे सांगितले आहे की या वानाचा कालावधी कमी असल्यामुळे शेतकरी याची लवकर निवड करतात. कारण शेतकरी दिवाळीनंतर कापूस कमी करून हरभरा किंवा गहू या पिकाचे पेरणी करतात आणि ही पेरणी कबड्डी या वानाच्या बियाणातूनच होते.