महाराष्ट्रातील ‘या’ 7 जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता : भारतीय हवामान विभागाचा अंदाज | bhartiy havaman vibhagacha aandaj

शेतकरी व्हाट्सअप ग्रुप Join Now

bhartiy havaman vibhagacha aandaj महाराष्ट्रात सध्या मिश्र हवामानाची परिस्थिती आहे. एकीकडे राज्यात कडक उन्हाची लाट पसरली असून तर दुसरीकडे काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. असे मिश्र हवामान पाहायला मिळत आहे.

उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच राज्यात उष्णतेची तीव्रता वाढलेली दिसते. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये तापमान ४२ अंश सेल्सिअस पेक्षा अधिक नोंदवले गेले आहे. कमाल तापमानात वाढ होऊन उन्हाळा तापदायक बनला आहे. हा तर उन्हाळ्याचा प्रारंभच आहे. आणखी दोन महिने उन्हाळा राहिलेला आहे. म्हणून येत्या काळात उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

रात्रीच्या वेळीही उष्णतेचा त्रास भोगावा लागतोय. उष्णतेमुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतो आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

उन्हापासून थोडासा दिलासा मिळवण्यासाठी पावसाचीही सुरुवात झाली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, छत्तीसगड आणि परिसरात समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर जोरदार चक्राकार वारे वाहत असल्याने महाराष्ट्रात अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. विदर्भ, अंतर्गत कर्नाटक व तामिळनाडूपर्यंत या वाऱ्यांचा परिणाम जाणवत आहे.

विदर्भ, खानदेश, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली आहे. विशेषत: विदर्भातील अमरावती, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या सात जिल्ह्यांमध्ये आज वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने या सात जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देखील दिला आहे.

एकंदरीत महाराष्ट्राला सध्या मिश्र हवामानाचा सामना करावा लागत आहे. उन्हापासून राहवावे म्हणून पावसाची हजेरी झाली आहे. परंतु आगामी काळात उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. bhartiy havaman vibhagacha aandaj

Leave a Comment