बारावी परीक्षेची तारीख ठरली, बघा वेळ आणि वेबसाइट 12th exam date

12th exam date शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मिळणार दोन संधी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची (HSC Result Date) तारीख जाहीर करण्यात आली आहे. मंगळवारी, २१ मे रोजी दुपारी १ वाजता बारावीचा निकाल जाहीर केला जाईल, अशी घोषणा महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाकडून करण्यात आली आहे.

निकाल जाहीर होण्याची प्रक्रिया मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार मंगळवारी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यातील नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाइन जाहीर केला जाईल:

१) mahresult.nic.in २) http://hscresult.mkcl.org
३) www.mahahsscboard.in ४) https://results.digilocker.gov.in ५) http://results.targetpublications.org

डिजीलॉकरमध्ये गुणपत्रिका संग्रहित करता येणार आहे. परीक्षार्थींच्या विषयनिहाय गुणांची माहिती या संकेतस्थळांवरून उपलब्ध होईल आणि त्याची प्रिंटआउट घेता येईल. तसेच डिजीलॉकर ॲपमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

गुणपडताळणी व पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन प्रक्रिया विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही एका विषयाच्या गुणांची गुणपडताळणी करण्यासाठी किंवा त्या विषयाच्या उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. २२ मे ते ५ जून या कालावधीत http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करता येईल आणि शुल्क डेबिट/क्रेडिट कार्ड, UPI किंवा नेट बँकिंगद्वारे भरता येईल.

ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्यक आहे. छायाप्रत मिळाल्यानंतर पुढील पाच कार्यालयीन दिवसांत संबंधित विभागीय मंडळाकडे विहित शुल्क भरून ऑनलाइन पध्दतीने अर्ज करावा लागेल. अधिक माहितीसाठी विभागीय मंडळाशी संपर्क साधावा.

विद्यार्थ्यांसाठी दोन संधी उपलब्ध फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या उच्च माध्यमिक परीक्षेत सर्व विषयांसह उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रेणी/गुणसुधारासाठी लगेचच्या दोन संधी उपलब्ध राहतील. पहिली संधी जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी असेल. या परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी व श्रेणीसुधारासाठीच्या विद्यार्थ्यांना २७ मे पासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन आवेदन करता येईल. दुसरी संधी फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये मिळेल.

Leave a Comment