vihir yojana 2024 शेतकऱ्यांसाठी पाणी हा जीवनदायी घटक आहे. शेतीसाठी पाण्याची गरज अत्यंत महत्त्वाची असते. पुरेसे पाणी नसल्यास पिकांची उत्पादकता कमी होते आणि शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. या समस्येवर उपाय म्हणून शासनाने ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नवीन विहिरी खोदण्यासाठी अनुदान दिले जाते.
कृषी संजीवनी योजनेचा मुख्य उद्देश हा शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास मदत करणे आणि शेतीसाठी संरक्षित पाण्याची सोय उपलब्ध करून देणे आहे. जेणेकरून पिकांच्या उत्पादनात वाढ होईल. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नवीन विहिरी खोदण्यासाठी शंभर टक्के अनुदान दिले जाते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी लागू असतात. प्रथम, ज्या गावांची निवड कृषी संजीवनी प्रकल्पासाठी केली जाते, त्या गावातील अत्यल्प व अल्पभूधारक शेतकरी, अनुसूचित जाती/जमाती, महिला, दिव्यांग आणि इतर शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते. दुसरी अट म्हणजे शेतकऱ्याकडे किमान 0.40 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. तिसरी अट म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे आधीपासूनच सिंचनाची सोय नाही, अशांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
या साठी लागणारे कागदपत्र खालील प्रमाणे:
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- राशन कार्ड
- पासपोर्ट फोटो
- बँक पासबुक
- ७/१२ उतारा
तसेच, विहिरीचे स्थान अशा प्रकारे निवडले जाते की ती विहीर व पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत यांच्यात किमान 500 मीटरचे अंतर असावे. या शिवाय, महाराष्ट्र भूजल अधिनियम 2009 नुसार, नवीन विहीर व आधीच्या इतर विहिरी यांच्यात किमान 150 मीटरचे अंतर असणे आवश्यक आहे. विहिरीच्या स्थळाची निवड करताना भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडील वरिष्ठ भूवैज्ञानिकांचे पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे.
नवीन विहिरीचे काम पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त एक वर्षाचा कालावधी दिला जाईल. या योजनेअंतर्गत नवीन विहिरीच्या खोदकामासाठी आणि बांधकामासाठी शेतकऱ्यांना दोन टप्प्यात शंभर टक्के अनुदान दिले जाईल. vihir yojana 2024
पहिल्या टप्प्यात विहिरीचे खोदकाम पूर्ण झाल्यावर अंदाजपत्रकानुसार खर्च दिला जाईल. दुसऱ्या टप्प्यात विहिरीचे खोदकाम व बांधकाम पूर्ण झाल्यावर अंदाजपत्रकानुसार खर्च दिला जाईल. एकूण अडीच लाख रुपयांच्या अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यावर जमा केली जाईल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली दिलेल्या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करा