सोयाबीन बाजारभावात होणार मोठी वाढ, तज्ज्ञांचे मत पहा Soyabean Prize

शेतकरी व्हाट्सअप ग्रुप Join Now

Soyabean Prize: सोयाबीन व कापूस उत्पादकांसाठी महत्वाची बातमी आहे. या वर्षी कापूस पीक लागवडीखालील क्षेत्र खुप प्रमाणात कमी झाले आहे. या वर्षी कापूस लागवडीखालील क्षेत्र अकरा टक्क्यांनी कमी झाले आहे. राज्यातील खुप शेतकरी सोयाबीन व कापसाच्या पिकावर अवलंबून आहेत.

गेल्या काही वर्षांपासून सोयाबीन व कापसाच्या उत्पादनात व किंमतीत कमी होत आहे. याचा खुप मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अशा परिस्थितीमुळे गेल्या वर्षी सरकारला कापूस व सोयाबीन च्या पीकासाठी अनुदानाची घोषणा करावी लागली होती. काही दिवसांनी शेतकर्यांना अनुदानाची रक्कम मिळणार आहे.

सध्याचे हवामान कापुस पीकासाठी पोषक आहे. मराठवाडा व विदर्भामध्ये खूप पाऊस पडला असल्याने कापसाचे पीक चांगले बहरले आहे. यामुळे यावर्षी उत्पादन वाढेल अशी शक्यता आहे. कापसाचे बाजारभाव स्थिर राहील असे सांगण्यात येत आहे. कापसाचा हंगाम विजयादशमी पासून सुरू होत असल्याने तेव्हाच उत्पादनाचा योग्य अंदाज सांगता येईल.

हे पण वाचा:
Maharashtra Rain पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस; या भागात ऑरेंज तर कुठं यलो अलर्ट जारी Maharashtra Rain

सोयाबीन चे उत्पादन ही या वर्षी चांगले झाले आहे. यावर्षी जागतिक सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र एक टक्क्याने वाढले आहे. पण देशातील सध्याचे हवामान सोयाबीन पिकासाठी पोषक नसल्याचे सांगितले जात आहे. जुलै व ऑगस्टमध्ये सोयाबीन उत्पादक भागात खुप पाऊस पडला होता. त्यामुळे सोयाबीन चे पीक धोक्यात आहे. यामुळे सोयाबीन च्या उत्पादनात घट येणार असे बोलले जात आहे.

जर असे झाले तर सोयाबीन च्या बाजारभावात वाढ होऊ शकते. पुढचे दोन महिने सोयाबीन व कापसाच्या उत्पादनासाठी महत्वाचे आहेत. पुढील दोन महिने हवामान कसे राहील यावर सोयाबीन व कापसाचे बाजारभाव अवलंबून आहे.

हे पण वाचा:
today's weather या तारखेला महाराष्ट्राला धडकणार सर्वात मोठे चक्रीवादळ पहा आजचे हवामान today’s weather

Leave a Comment