Onion Prize : जे लोक कांद्याचे उत्पादन करतात त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. लोकसभा निवडणुकी पुर्वी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खुप संकटांना सामोरे जावे लागले होते. कांद्याला खुप कमी दर मिळत होता.
शेतकऱ्यांना कांदा उत्पादनासाठी जो खर्च आला होता तो देखील भरुन निघत नव्हता. पण लोकसभा निवडणुकी नंतर हे चित्र पालटुन गेले. लोकसभा निवडणुकी नंतर कांद्याच्या बाजारभावात सुधारणा झाली. यामुळे कांदा उत्पादकांना आता दिलासा भेटत आहे.
अजुन देखील कांदा निर्यातीसाठी शेतकर्यांना सरकारने काही जाचक अटी नियम कायम ठेवल्या आहेत. कांदा निर्यातीसाठी आता किमान निर्यात मूल्य व निर्यात शुल्क लागू आहे. या सरकारच्या निर्बंधांमुळे कांद्याची निर्यात खुप कमी झाली आहे. जर हे निर्बंध कमी झाले तर कांद्याची निर्यात वाढेल असे बोलले जात आहे. म्हणून शेतकरी हे निर्बंध मागे घेण्यासाठी मागणी करत आहेत.
आता आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ लासलगाव एपीएमसी सह निफाड, मनमाड या नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठेमध्ये कांद्याचे दर सुधारले जाण्याचे बोलले जात आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याचा दरात 500 ते 650 रुपयांची वाढ झाली आहे.
सध्या नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पादन समित्यांमध्ये कांद्याला क्विंटलमागे 3390 ते 3550 इतका भाव मिळत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत हे बाजारभाव 600-650 रुपयांनी अधिक आहे.
कांद्याचे दर वाढल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा भेटला आहे. आता शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. पण सर्वसामान्य ग्राहकांवर याचा परिणाम होत असल्याचे पहायला मिळत आहे. घाऊक बाजारात कांद्याच्या किंमतीत वाढ झाल्याने किरकोळ बाजारात देखील कांद्याचे भाव वाढल्याचे पाहायला मिळत आहे.