nuksan bharpai jahir राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईची रक्कम दुप्पट होणार आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके नुकसानग्रस्त झाली होती. कापूस, तूर अशा महत्त्वाच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई म्हणून राज्य शासनाने आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून शेतकऱ्यांना जी मदत दिली जाते ती रक्कम आता दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याअगोदर शेतकरी नुकसान भरपाईसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या (NDRF) तुलनेत दुप्पट रक्कम मिळत होती. आता मात्र राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून (SDRF) मिळणारी रक्कम दुप्पट करण्यात आलेली आहे.
राज्य आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत राज्य आपत्ती प्रतिसाद निधी स्थापन करण्यात आलेला आहे. या निधीत केंद्र शासनाकडून 75 टक्के रक्कम येते तर राज्य शासनाकडून 25 टक्के रक्कम येते. या निधीतून दुष्काळ, चक्रीवादळ, भुकंप, गारपीट, पूर, थंडीची लाट, हिमवृष्टी अशा नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना मदत केली जाते.
अवकाळी पावसाने झालेल्या पीक नुकसानीसाठी शासनाने 2109 कोटी 12 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निर्णयानुसार आता शेतकऱ्यांना मिळणारी मदत दुप्पट होईल. उदाहरणार्थ, आधी हेक्टरी 6800 रुपये नुकसान भरपाई मिळत होती. आता मात्र शेतकऱ्यांना हेक्टरी 13,600 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. nuksan bharpai jahir
नुकसान भरपाईच्या रकमेत झालेली ही वाढ शेतकऱ्यांना खूपच मोठा दिलासा देणारी आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. उत्पन्नाचे मुख्य साधन म्हणजेच पिक नष्ट झाल्याने शेतकरी भयंकर अडचणीत सापडले होते. अशा वेळी शासनाकडून आलेल्या या महत्त्वाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे कित्येकांचे प्रश्न सुटले आहेत.
मात्र काहींचे म्हणणे आहे की, हेक्टरी मिळणाऱ्या नुकसान भरपाईची रक्कम अजूनही अपुरी आहे. दुप्पट केल्याने काहीसा दिलासा मिळाला