New rates of ST नमस्कार मित्रांनो, आपल्याला एसटी महामंडळाचा मोठा झटका वाढवलेल्या भाड्याविषयी माहिती देण्यासाठी मी आलो आहे. ऑगस्ट महिन्यात एसटी महामंडळाने ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. या झटक्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला नक्कीच झळा बसणार आहे.
एसटी महामंडळाने जीएसटीच्या प्रवासात दहा टक्के शुल्क वाढवले आहे. म्हणजेच तुम्हाला ज्या ठिकाणी वीस रुपये लागायचे आता त्याच ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला 25 रुपये देखील लागू शकतात. या निर्णयामुळे एसटी महामंडळाच्या प्रवासात घट होईल असे वाटत नाही.
या निर्णयाचा परिणाम
या निर्णयाचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर थेट होणार आहे. कारण सध्या सर्वच वस्तू महाग झाल्यामुळे एसटीचे भाडे महाग होणे ही काही वेगळी गोष्ट नाही. या परिणामामुळे एसटीचे भाडे वाढल्यामुळे अनेक प्रवासी एसटी मध्ये प्रवास करणे बंद करतील. पावसाळ्यात अनेकांचे डोके गरम होणार आहे, कारण एसटीचा प्रवास हा सर्वात जास्त पुरवणारा प्रवास असतो.
मंदिर-धबधबे दर्शन करणारे प्रवासी किंवा भक्तांवर होणारा परिणाम
या पावसाळ्याच्या वातावरणात अनेक जण निसर्ग रम्य वातावरण फिरण्यासाठी जातात. तसेच अनेक जण या दिवशी धबधबे तसेच देवस्थान करण्यासाठी जातात. त्याचबरोबर आता पुढील चार-पाच दिवसात श्रावण महिना लागेल. या महिन्यात अनेक जण महादेवाच्या मंदिरात दर्शन करण्यासाठी दूर दूर जातात. या भक्तांना देखील आता एसटी चे भाडे वाढणार असल्यामुळे थोडा का होईना त्रास होणार आहे.
वरिष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना अर्ध्या टिकिटावर सवलत
मात्र एसटीच्या भाड्यात 65 वयोगटाच्या पुढील सर्व नागरिकांना मोफत प्रवास दिला जात आहे. यामुळे या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.
त्याचबरोबर महिलांना अर्ध्या टिकिटावर महाराष्ट्रभरात कुठेही फिरता येत आहे. यामुळे महिलांना देखील जास्त तोटा सहन करावा लागणार नाही. परंतु पुरुषांना नक्कीच थोडा आर्थिक व्यवहार सोसावा लागणार आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाव कमी होऊ शकतात
परंतु, येत्या काही दिवसात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे भाव देखील कमी होऊ शकतात असा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला आहे. कारण या वेळी राजकीय पक्ष मतदारांना लोकप्रिय व्हायचा प्रयत्न करणार असतात.
एकूणच एसटी महामंडळाचा हा निर्णय सर्वसामान्य नागरिकांसाठी धक्कादायक आहे. या निर्णयामुळे अनेक प्रवासी एसटीच्या प्रवासातून दूर राहतील. परंतु वयोवृद्ध नागरिकांना आणि महिलांना अनुक्रमे मोफत प्रवास व अर्धी टिकिट सवलत मिळत असल्याने त्यांच्या बाबतीत काहीही तक्रार नाही.
निवडणुकीच्या जवळपास येताच राजकीय पक्षांच्या दबावामुळे हे भाव कमी होऊ शकतात अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.