अंगणवाडी मदतनीस १४ हजार ६९० पदांची भर्ती सुरू, अशा प्रकारे करा अर्ज Maharashtra Anganwadi Bharti 2024

शेतकरी व्हाट्सअप ग्रुप Join Now

Maharashtra Anganwadi Bharti 2024: महाराष्ट्रामध्ये आंगनवाड़ी मदतनीस च्या १४ हजार ६९० पदांची भर्ती सुरू झाली आहे. ही भर्ती एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंर्तगत होणार आहे. या भर्ती संबंधित माहिती महिला व बाल विकास विभागाने दिलेल्या निर्देशानुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे यांनी दिली आहे. ही रिक्त पदे भरण्यासाठी मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत आहे. 

या भर्ती ची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. इच्छुक महिलांनी अर्ज करावेत असे आवाहन आदिती तटकरे यांनी केले आहे. आदिती तटकरे म्हणाल्या की सध्या अंगणवाडी मदतनीसांची १३ हजार ९०७ रिक्त पदे आहेत. लवकरच १४ हजार ६९० पदांची जाहिरात निघणार आहे.

शहरी प्रकल्पात ज्या कार्यरत अंगणवाड्या आहेत त्यांच्यासाठी ७८३ अंगणवाडी मदतनीसांची पदे रिक्त आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ९०१ मिनी अंगणवाड्या व राज्यातील १३ हजार सात अंगणवाड्या आता मोठ्या होणार आहेत. आता सर्वच अंगणवाड्या मध्ये मदतनीसांची पदे भरण्यात येणार आहेत. राज्यात १३ हजार बारावी उत्तीर्ण तरुणींसह महिलांना ही नोकरी मिळणार आहे.

हे पण वाचा:
BMC Recruitment 2024 मुंबई महापालिकेत मेगाभरती! १,८४६ रिक्त पद भरणार! अशा प्रकारे करा अर्ज, अर्जाची शेवटची तारीख काय ? BMC Recruitment 2024

अंगणवाडी भर्ती साठी आवश्यक कागदपत्रे –

जर तुम्हाला अंगणवाडी भर्ती साठी अर्ज करायचा असेल तर तुमच्या कडे ही कागदपत्रे असणे आवश्यक आहे –

  • आधारकार्ड
  • शिधापत्रिका
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • रहिवासी दाखला
  • दहावी किंवा त्याहुन जास्त शिक्षणाचे प्रमाणपत्र

Maharashtra Anganwadi Bharti 2024 साठी पात्रता – 

हे पण वाचा:
job in the Air Force १२ वी पास विध्यार्थ्यांना हवाई दलात नोकरी करण्याची मोठी संधी असा करा अर्ज..! job in the Air Force
  • अंगणवाडी भर्ती साठी अर्ज करण्यासाठी महिला महाराष्ट्र राज्याची मूळ निवासी असणे गरजेचे आहे.
  • या भर्तीसाठी फक्त महिलाच अर्ज करु शकतात.
  • महिलेचे वय १८ ते ४० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
  • किमान दहावी पास असणे आवश्यक आहे.

अंगणवाडी भर्ती साठी अर्ज करण्याची तारीख व प्रक्रिया –

अंगणवाडी मदतनीस भर्ती साठी जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर या भर्तीसाठी अर्ज करण्याची तारीख व प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती मिळेल.

Leave a Comment