Land Records: आता घरबसल्या ऑनलाइन पहा आपल्या शेतजमीनीचा नकाशा, फेरफार, सातबारा

शेतकरी व्हाट्सअप ग्रुप Join Now

Land Records: सर्व शेतकर्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही तुमच्या शेत जमिनीचे नकाशे ऑनलाईन पाहू शकता. जर तुम्हाला तुमच्या शेतजमीनीचा नकाशा पाहिजे असेल तर तुम्ही ऑनलाईन काढून घेऊ शकता. तुम्ही एक नंबर टाकून काही सेकंदामध्ये तुमच्या शेतजमीनीचा नकाशा काढून घेऊ शकता.

आता सर्व ऑनलाईन होत आहे. आम्ही या पोस्टमध्ये तुम्हाला शेतजमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा काढायचा याबाबत माहिती देणार आहोत. जर तुम्हाला तुमच्या शेतजमीनीचा नकाशा ऑनलाईन पद्धतीने काढायचा असेल तर आमची ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.

ऑनलाईन शेतजमिनीचा नकाशा कसा पहावा – 

हे पण वाचा:
Shelipalan Aani Kukutpalan Aanudan शेळीपालन आणि कुकूटपालनासाठी शेतकऱ्यांना सरकार देत आहे 4 लाख अनुदान पहा अर्ज प्रक्रिया..! Shelipalan Aani Kukutpalan Aanudan
  • जर तुम्हाला ऑनलाईन शेतजमिनीचा नकाशा पहायचा असेल तर तुम्हाला सर्वात आधी mahabhunakasha.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल.
  • आता तुमच्या समोर नवीन पेज ओपन होईल व त्यावर डाव्या बाजूला तुम्हाला एक लोकेशन चा रकाना दिसेल. यात तुम्हाला तुमच्या राज्याची कैटेगरी रुलर व अर्बन असे पर्याय दिसतील. जर तुमची शेतजमीन ग्रामीण भागात असेल तर तुम्हाला रुलर या पर्यायावर क्लिक करायचे आहे. आणि जर तुमची शेतजमीन शहरी भागात असेल तर तुम्हाला अर्बन या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • आता तुम्हाला तुमचा तालुका, जिल्हा व गाव निवडायचे आहे. यानंतर आता तुम्हाला व्हिलेज मॅप हे नाव दिसेल. यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
  • आता तुमची शेतजमीन ज्या गावात आहे. त्या गावाचा नकाशा तुमच्या समोर येईल.

नकाशा समोर आल्यानंतर तुम्हाला होम पर्यायासमोरील आडव्या बटनावर क्लिक करायचे आहे. आता तुम्हाला नकाशा फुल स्क्रीन मध्ये दिसेल. 

  • डावीकडे प्लस किंवा मायनस बटनावर क्लिक करुन तुम्ही हा नकाशा मोठ्या किंवा छोट्या आकारामध्ये पाहू शकता.
  • गट क्रमांक टाकून ऑनलाईन नकाशा पाहण्याची पद्धत
  • जर तुम्हाला तुमच्या शेतजमीनीचा नकाशा पहायचा असेल तर तुम्ही गट क्रमांक टाकून देखील पाहू शकता.
  • तुम्हाला वेबसाईटवर ‘सर्च बाय प्लॉट नंबर’ हा पर्याय दिसेल. तुम्हाला तिथे सातबारा उतार्यावरील गट क्रमांक टाकून घ्यायचा आहे.
  • आता तुमच्या जमिनीचा गट नकाशा तुमच्या समोर ओपन होईल. तुम्ही हा नकाशा मोठा किंवा छोटा करुन देखील पाहू शकता.
  • तुम्हाला ती शेतजमीन कोणाच्या नावावर आहे, शेतकर्याचे नाव व एकूण किती जमीन आहे ही सर्व माहिती तुम्हाला समजेल.
  • शेवटी तुम्हाला मॅप रिपोर्ट हा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर जमिनीचा प्लाॅट रिपोर्ट येईल.

शेतजमीनीचा नकाशा कसा डाउनलोड करायचा ?

जर तुम्हाला शेतजमिनीचा नकाशा डाउनलोड करायचा असेल तर तुम्हाला डाउनलोड हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करुन तुम्ही शेतजमिनीचा नकाशा डाउनलोड करु शकता.

हे पण वाचा:
Ration card रेशन कार्ड धारकांचे आजपासून गहू तांदूळ बंद मिळणार 9 वस्तू मोफत Ration card

Leave a Comment