शेतकरी व्हाट्सअप ग्रुप
Join Now
Land Count: जेव्हा आपल्याला भूमापन करायचे असते तेव्हा आपल्याला कार्यालयात जावे लागते. तहसील कार्यालयात जाणे व खुप वेळ वाट पाहणे यामध्ये आपला खुप वेळ व पैसा वाया जातो. जमीनींच्या सीमांवरुन खुप वेळा वाद होतात व यावरुन मार्ग काढण्यासाठी जमिनींची मोजणी करणे आवश्यक असते. आता जमिनीची मोजणी तुम्ही ऑनलाईन करु शकता. जमिनीची मोजणी करण्यासाठी तुम्हाला कार्यालयात जाण्याची गरज पडणार नाही. जर तुम्हाला जमीनीची मोजणी करायची असेल तर
घर बसल्या जमीन मोजणी साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया –
- जर तुम्हाला घर बसल्या जमीन मोजणी साठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सर्वात आधी तुमच्या जिल्ह्याच्या महसूल विभागाला भेट द्यावी लागेल.
- आता तुमचा आईडी पासवर्ड द्वारे लाॅगिन करा. आता अभिलेख सेवा निवडा. तुम्हाला अभिलेख सेवा या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- आता जमीन मोजणी या पर्यायावर क्लिक करा. आता तुमचा जिल्हा, तालुका व गाव याबाबत आवश्यक माहिती भरा.
- आता ऑनलाईन फी भरा. आता सबमिट या बटनावर क्लिक करा.
शेत जमीन मोजणी अर्ज डाउनलोड प्रक्रिया –
- जर तुम्हाला शेत जमीन मोजणी अर्ज डाउनलोड करायचा असेल तर सर्वात आधी https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/ या लिंकवर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या समोर वेबसाइट ओपन होईल. शेत जमीन मोजणी अर्ज डाउनलोड करण्नयासाठी मोजणी अर्ज नमुना या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्या मोबाईलवर शेत जमीन मोजणी अर्ज दिसेल. याला तुम्हाला डाउनलोड करायचे आहे.
शेत जमीन मोजणी अर्ज फी पेमेंट प्रक्रिया –
- तुम्हाला वेबसाइट वर Make Payment असा एक पर्याय दिसेल. त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. आता तुमच्या समोर तपशील येईल तो वाचून घ्या.
- आता हिरव्या रंगाच्या कन्फर्म या बटनावर क्लिक करा. आता तुम्हाला ज्या प्रकारे पेमेंट करायचे असेल ती पेमेंट ची पद्धत निवडायची आहे.
- जर तुम्ही इंटरनेट बँकिंग हा पर्याय निवडला असेल तर तुमचे अकाऊंट ज्या बॅंकेत असेल ते खाते निवडा व मेक पेमेंट या पर्यायावर क्लिक करा.