राज्यातील या जिल्ह्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस तर या जिल्ह्याना इशारा बघा आजचे हवामान Heavy rain

व्हाट्सअप ग्रुप Join Now

Heavy rain मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा सर्वात जास्त फटका बसला आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गुरुवारी जळगाव येथे 45.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अशा उच्च तापमानामुळे रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. काही नागरिकांना तापमानावाढीमुळे मोहरकाही पडला आहे.

अवकाळी पावसाने दिलासा

उष्णतेच्या लाटेपासून थोडासा दिलासा मिळावा म्हणून नागरिक अवकाळी पावसाची आतुरतेने वाट पाहात होते. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवडाभरापासून अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे त्या भागातील नागरिकांना उकाड्यापासून थोडासा दिलासा मिळाला आहे.

हे पण वाचा:
राज्यात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण! पुढील 24 तासात होणार मुसळधार पाऊस पहा आजचे हवामान Heavy rain expected

पावसाची शक्यता

हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी तर उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

इशारा आणि सावधगिरी

हे पण वाचा:
return rains Punjabrao Dakh महाराष्ट्रावर मोठे संकट परतीचा पाऊस या जिल्ह्यामध्ये घालणार धुमाकूळ पंजाबराव डख return rains Punjabrao Dakh

सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. पुण्याच्या काही भागांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

उष्णतेच्या लाटेचा अंदाज

धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, अकोला या जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

हे पण वाचा:
Heavy rain occur परतीचा पाऊस लांबणीवर 24 तासात या जिल्ह्यामध्ये होणार मुसळधार पाऊस पंजाबराव डख Heavy rain occur

मुंबईत बेहाळ वातावरण

मुंबईत 24 मे रोजी 34 अंश सेल्सिअस कमाल तर 27 अंश सेल्सिअस किमान तापमान राहण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस म्हणजे शनिवार, 25 मे पर्यंत राज्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची स्थिती जाणवू शकते अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

हे पण वाचा:
heavy rain राज्यात मुसळधार पाऊसाची शक्यता! या जिल्ह्याना अतिवृष्टीचा फटका heavy rain

Leave a Comment