महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा! हवामान विभागाचा अंदाज heavy rain

व्हाट्सअप ग्रुप Join Now

heavy rain अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा हाल महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा थैमान सुरू आहे. अनेक भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. फळबागा, पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचा हाल झाला आहे. मात्र अजूनही या अवकाळी पावसाचे संकट टळलेले नाही. हवामान खात्याकडून पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान खात्याचा इशारा

हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण कोंकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबतच विजांच्या कडकडाटाचीही शक्यता आहे. दरम्यान पाऊस पडणार असला तरी सोबतच सोसाट्याचा वारा देखील वाहणार आहे. वाऱ्याचा वेग प्रतितास 30 ते 40 किमी इतका असू शकतो. त्यामुळे घराबाहेर पडताना काळजी घेणे गरजेचे आहे.

उष्णतेची लाट

दुसरीकडे उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातही उष्णता वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये पुढील 24 तासांत हवामान कोरडे राहील. या काळात शहराचे तापमान 35 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.

हे पण वाचा:
राज्यात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण! पुढील 24 तासात होणार मुसळधार पाऊस पहा आजचे हवामान Heavy rain expected

जेऊरमध्ये उष्णतेची टोकाची पातळी राज्यात सर्वाधिक तापमान जेऊरमध्ये नोंदवण्यात आले आहे. जेऊरमध्ये कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस एवढे नोंदवण्यात आले. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही उष्णतेची लाट आहे.

शेतकऱ्यांचे नुकसान

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे. फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. आता पुन्हा एकदा अवकाळीचा इशारा देण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने पुढाकार घेणे गरजेचे आहे. नुकसानीची भरपाई करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी लागणार आहे. अन्यथा शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.

हे पण वाचा:
return rains Punjabrao Dakh महाराष्ट्रावर मोठे संकट परतीचा पाऊस या जिल्ह्यामध्ये घालणार धुमाकूळ पंजाबराव डख return rains Punjabrao Dakh

Leave a Comment