BMC Recruitment 2024: मुंबई महापालिकेत नवीन भरती निघाली आहे. ही भर्ती कार्यकारी सहायक म्हणजेच लिपिक पदासाठी आहेत. या पदासाठी १,८४६ जागा रिक्त आहेत. जर तुम्हाला या पदासाठी अर्ज करायचा असेल तर हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. या भर्तीसाठी २० ऑगस्ट पासून ऑनलाईन अर्ज प्रणाली सुरू होणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ सप्टेंबर २०२४ असणार आहे.
कुणाला किती आरक्षण ?
मुंबई महानगरपालिकेत गट क वर्गातील पदांसाठी भर्ती निघाली आहे. ही भर्ती १,८४६ पदांसाठी असणार आहे. या पदासाठी बेसिक वेतन २५,५००-८१,००० असणार आहे. १८४६ जागांपैकी १४२ जागा अनुसूचित जातींसाठी, १५० जागा अनुसूचित जमातींसाठी, विमुक्त जाती -(अ) साठी ४९ जागा, भटक्या जमाती (ब) साठी ५४ जागा, भटक्या जमाती (क) साठी ३९ जागा, भटक्या जमाती
(ड) साठी ३८ जागा, विशेष मागास प्रवर्गासाठी ४६ जागा, इतर मागासवर्गासाठी ४५२ जागा, ईडब्ल्यूएस साठी १८५ जागा, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गासाठी १८५ जागा व खुल्या प्रवर्गासाठी ५०६ जागा रिक्त आहेत. याशिवाय समांतर आरक्षणामध्ये वरील रिक्त पदांसाठी वर्गीकरण करण्यात आले आहे.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख –
मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहायक या पदासाठी भरती निघाली आहे. या भर्तीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. २० ऑगस्ट पासून तुम्ही या पदासाठी अर्ज करु शकता. या भर्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १ सप्टेंबर २०२४ आहे.
काय आहे या भर्ती संबंधित जाहिरात –
जर तुम्हाला या भर्तीची जाहिरात वाचायची असेल तर तुम्ही https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn या लिंकवर क्लिक करुन वाचु शकता. या जाहिराती मध्ये ऑनलाईन अर्जाची लिंक सुद्धा आहे. तुम्ही त्या लिंकवर क्लिक करुन या भर्तीसाठी अर्ज करु शकता.
इथे करा संपर्क –
जर तुम्हाला या भर्ती संबंधित कोणतीही समस्या असेल किंवा अर्ज करताना कोणती समस्या येत असेल तर तुम्हाला संपर्क साधण्यासाठी संपर्क क्रमांक दिला आहे. तुम्ही ९५१३२५३२३३ या क्रमांकावर संपर्क करु शकता. या क्रमांकावर तुम्ही सोमवार ते शनिवार सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत संपर्क करु शकता.