अशा प्रकारे पहा मोबाईल वरुन 1880 पासून चे जुने सातबारा फेरफार Land Record

शेतकरी व्हाट्सअप ग्रुप Join Now

Land Record 1880: जेव्हा आपल्याला जमिनिशी संबंधित कोणताही व्यवहार करायचा असतो तेव्हा आधी जमिनीचा इतिहास पाहणे गरजेचे असते. इतिहास म्हणजे ती जमीन आधी कोणाच्या नावावर होती, त्यानंतर जमिनीच्या अभिलेखात काय बदल होत गेले याची माहिती पाहायची असते. ही माहिती तहसील कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालयातल्या सातबारा उतारा खाते यामध्ये असते. आता ही माहिती ऑनलाईन उपलब्ध करून दिली जाते. 

सरकार ने आता सर्व जिल्ह्यातील 30 कोटी उतार्यांचा संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. आता हे उतारे ऑनलाईन उपलब्ध करून दिले जात आहेत. हे उतारे कसे पाहायचे याबाबत खुप लोकांना माहिती नसते. त्यामुळे आम्ही तुम्हाला या पोस्ट द्वारे हे उतारे कसे पाहावे याबाबत माहिती देणार आहोत.

असे पाहा मोबाईल वरुन Land Record 1880 पासून चे जुने सातबारा फेरफार उतारे –

हे पण वाचा:
Shelipalan Aani Kukutpalan Aanudan शेळीपालन आणि कुकूटपालनासाठी शेतकऱ्यांना सरकार देत आहे 4 लाख अनुदान पहा अर्ज प्रक्रिया..! Shelipalan Aani Kukutpalan Aanudan
  • जर तुम्हाला Land Record 1880 पासून चे जुने सातबारा फेरफार उतारे पाहायचे असतील तर सर्वात आधी तुम्हाला aapleabhilekh.mahabhumi.gov.in या महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाच्या वेबसाइट वर जावे लागेल.
  • आता तुमच्या समोर होमपेज येईल. तिथे तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड टाकून नवीन खाते बनवायचे आहे.
  • आता या युजर आईडी आणि पासवर्ड च्या मदतीने लाॅगिन करायचे आहे. आता अकाउंट वर रिचार्ज करायचे आहे.
  • यानंतर तुम्ही पाहिजे ते दस्तावेज सिलेक्ट करून गावाची, गटाची माहिती, तालुका, गट नंबर किंवा खाते नंबर टाकून तुम्हाला पाहिजे ते दस्तावेज डाउनलोड करुन घेऊ शकता.

सातबारा उतारा वाचताना लक्षात घ्या हे मुद्दे

जर तुम्ही सातबारा उतारा वाचत असाल तर तुम्ही हे मुद्दे लक्षात घेणे गरजेचे आहे –

  • मालकी हक्क – जमीन मालकांची नावे व त्यांच्या हक्कांची माहिती
  • ऋण आणि तारण – जमीनीवर ऋण किंवा तारण आहे का हे पहावे.
  • पीक माहिती- जमिनीवर कोण कोणत्या पिकांची लागवड केली जाते हे पहावे.
  • इतर माहिती – जमिनीचा प्रकार, क्षेत्र व इतर महत्त्वाची माहिती देखील पहावी.

ऑनलाईन सातबारा उतार्याचे फायदे –

हे पण वाचा:
Ration card रेशन कार्ड धारकांचे आजपासून गहू तांदूळ बंद मिळणार 9 वस्तू मोफत Ration card
  • ऑनलाईन सातबारा उतार्याने तुम्हाला घर बसल्या जमिनीची माहिती मिळते.
  • सरकारी कार्यालयात जाऊन खुप वेळ लाइन लावायची आवश्यकता पडत नाही त्यामुळे वेळेची बचत होते.
  • जमिनीच्या मालकी हक्कांबाबत स्पष्ट माहिती मिळते.
  • डिजिटल सातबारा उतारा अधिकृत व प्रमाणित असतो.

Leave a Comment